Tuesday, June 26, 2012

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात-

१. नामापासून काही मिळावयाचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव. विस्तवाजवळ तूप ठेवले कि ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. अखंड नामस्मरणाला सोवळ्या-ओवळ्याचे बंधन नाही. अखंड स्मरणाच सोवळे आहे. 

२. मी मागतसे एक दान, ते द्यावे तुम्ही सर्वांनी II नामापरते नका माणू सुख, रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण II
    याहून नको मज काही, एवढी भीक घालावी सर्वांनी II

३. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे 

४. देहाची स्थिती कायम न राहे निश्चित II
    ते सांभाळणे आहे जरूर, न विसरता रघुवीर II

५. जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरुरीचे आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे. 

No comments:

Post a Comment