Wednesday, October 17, 2012

Some Excerpts While Reading

Name of the Book- महागुहेत प्रवेश- विनोबा भावे

* आपण मनापासून नेहमीच वेगळे आहोत ही गोष्ट चित्तात स्थिर करावी.

* चित्त प्रसन्न होते तेव्हा सहज शांतीची प्राप्ती होते. गीतेत म्हटले आहे- "प्रसन्नचेतसो ह्याशु बूद्धिः पर्यवतिष्ठते", म्हणजे चित्त निर्मळ असेल तर ते सहजच स्थिर राहते.

* दृढ संकल्पशक्तीने चित्तशुद्धीशिवाय ध्यान साधेल; पण तसे साधण्यात लाभ नाही, उलट नुकसान आहे.

* व्यक्तिगत फायद्यासाठी, वासानातृप्तीसाठी किंवा बाह्य गोष्टींसाठी व्यवहार करावयाचा नाही. एकाग्रतेसाठी अशी जीवनशुद्धी हवी.

* नियंत्रणाचा अर्थ आहे, हात पाय मन कान वाणी डोळे या सर्वांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना वाईटाकडे जाण्यापासून आवरणे आणि चांगल्या गोष्टीत लावणे. याचेच नाव वैराग्य आणि विवेक. गीतेच्या भाषेत सांगायचे तर अभ्यास आणि वैराग्य. ही मनोजयाची साधने आहेत.

* समदृष्टी होणे महत्त्वाचे. समदृष्टी म्हणजे शुभ-दृष्टी. ही सर्व सृष्टी मंगल भासली पाहिजे. सारे शुभ व पवित्र आहे. "विश्वं तद् भद्रं यदवन्ति देवाः" (ऋग्वेदसार २.४.७) - हे विश्व मंगल आहे, कारण परमेश्वर ते सांभाळीत आहे.

* माझा रक्षक काय तो मी एकता, बाकी सारे माझे भक्षक, ही कल्पना नाहीशी झाल्याशिवाय एकाग्रता होणार नाही. सर्वत्र मांगल्य पहा, म्हणजे चित्त आपोआप शांत होईल.

* मी अध्यात्मिक शक्तीची अशी व्याख्या केली आहे - अध्यात्मिक शक्ती ती जिचा दुरुपयोग होऊच शकत नाही.

* ध्यान परमात्म्याशी जोडले गेले तर ते अध्यात्मिक होईल, भौतिक वस्तूंशी जोडले गेले तर मानसिक होईल.

* आपल्याला वृत्ती नको स्थिती हवी.

* विज्ञानाचा अनुभव वैज्ञानिकांना येतो. निष्काम सेवेचा अनुभव नितीनिष्ठ सेवकांना येतो. हे दोन्ही अनुभव एका तिसऱ्या अनुभवाशिवाय अपूर्ण आहेत. तो तिसरा अनुभव भक्तीतून येतो !

* मानवसेवेने व आत्मनिष्ठेने  मनुष्य शुद्ध होईल, विज्ञाननिष्ठेने बुद्ध होईल, मात्र सिद्ध तेव्हाच होईल, जेव्हा त्याला आपल्या चेतनेत परमात्म-चेतनेच्या अविर्भावाचा अनुभव येईल. 

1 comment:

  1. * समदृष्टी होणे महत्त्वाचे. समदृष्टी म्हणजे शुभ-दृष्टी. ही सर्व सृष्टी मंगल भासली पाहिजे. सारे शुभ व पवित्र आहे. "विश्वं तद् भद्रं यदवन्ति देवाः" (ऋग्वेदसार २.४.७) - हे विश्व मंगल आहे, कारण परमेश्वर ते सांभाळीत आहे.

    * माझा रक्षक काय तो मी एकता, बाकी सारे माझे भक्षक, ही कल्पना नाहीशी झाल्याशिवाय एकाग्रता होणार नाही. सर्वत्र मांगल्य पहा, म्हणजे चित्त आपोआप शांत होईल.
    wahhh. chaanch

    ReplyDelete